पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या ‘जनसन्मान यात्रे’च्या माध्यमातून राज्यभर दौरा करत असून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत. अजित पवार आपल्या भाषणामध्ये नेहमी ‘मी सकाळी लवकर उठून कामांची पाहणी करतो, शेताच्या बांदावर जात असतो’, असे म्हणत असतात. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर आगपाखड केली होती. सकाळी तर दूधवाला पण उठतो. लवकर उठता मग आमच्याव उपकार करता का? असं म्हणाल्या. त्यावर आता अजित पवारांनी बारामतीच्या सभेत बोलताना जोरदार पलटवार केला आहे.
‘काहीजण म्हणतात सकाळी दूधवाला पण उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो. बोलू द्या.. बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का? हे म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणलाय. म्हणतात की दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण कुठं म्हटलं दुधवाला दुपारी उठतो, असं म्हणत अजित पवारांनी म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर पलटवार केला,
बाधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो, असे म्हणत राजकोट येथील पुतळा पाहणीसाठी मी सकाळी गेलो होतो. योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर घड्याळाकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘…आता ‘ते’ तुमच्या हातात’; विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साद
-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा दबदबा अन् नावाची दहशत; आंदेकरांचा इतिहास काय?
-सुनील शेळकेंनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी; गडकरी म्हणाले, ‘तुमचं काम झालंच म्हणून समजा’
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?