पुणे : पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील रिक्षाचालकांसाठी मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम हजारो रिक्षाचालक बांधवांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूल येथे संपन्न झालेल्या भिमालेंचा हा स्तुत्य उपक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व रिक्षाचालक बांधवांना गणवेश वाटप करण्यात आले.
‘पुणे शहराची वाहतूक व्यवस्था हे शहराच्या प्रगतीचे चाक आहे. शहराची वेळ वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जे कष्ट पीएमटी बस चालक, मेट्रो, लोकल या व्यवस्थेतील कर्मचारी घेतात तितकेच कष्ट पुणे शहरातील सर्वसामान्य रिक्षावाला देखील घेत असतो. पुणेकरांना वेळेवर आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षा ही नेहमी जवळचे आपुलकीचे साधन राहिले आहेत,’ असे श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत.
‘पुण्यनगरीची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या रिक्षावाल्यांना एक सन्मानाची वर्दी देण्याचा अभिनव उपक्रम आपण राबवत आहोत. या रिक्षा चालक बांधवांच्या अनेक अडी-अडचणी आहेत. बाहेरून आलेल्या ओला उबर सारख्या कंपन्या या रिक्षा चालकांच्या व्यवसायामध्ये स्पर्धा निर्माण करत असताना देखील हा सर्वसामान्य रिक्षावाला प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहे. या रिक्षा चालक बांधवांसाठी पेन्शन आणि इतर अन्य शासकीय सोयी सुविधा मिळणे देखील आवश्यक आहे. निश्चितच या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी देखील प्रयत्न करत आहोत. या गणवेश वाटप उपक्रमाद्वारे आपण रिक्षा चालक बांधवांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत’, असे मत यावेळी पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केले, या प्रसंगी आमदार सुनील भाऊ कांबळे आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा दबदबा अन् नावाची दहशत; आंदेकरांचा इतिहास काय?
-सुनील शेळकेंनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी; गडकरी म्हणाले, ‘तुमचं काम झालंच म्हणून समजा’
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार