पुणे : पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांंच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आला. काही तासांतच उपचारादरम्यान आंदेकरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तीघांना ताब्यातही घेतलं आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनाने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून या खूनाचे नेमके कारण काय? या खुनाशी गुन्हेगारी टोळीचा काय संबंध? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गुन्हेगारी टोळी कोणती?
१९८५ पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणारी टोळी पुणे शहरामध्ये फिरत होती. या टोळीचे नाव म्हणजे आंदेकर टोळी. आंदेकर टोळी ही शहरामध्ये तब्बल २५ वर्षे गुन्हे करत होती. या टोळीचा म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नसून बंडू उर्फ सुर्यकांत आंदेकर म्हणजेच वनराज यांचे वडिल हे होते.
वनराज आंदेकर हे सुर्यकांत आंदेकरांचे पुत्र असले तरीही वनराज यांचे आतापर्यंत कोणत्याही मोठ्या गुन्ह्यामध्ये नाव समोर आले नव्हते. गेल्या पाच वर्षातील नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांची संयमी आणि शांत स्वभावाचे नगरसेवक म्हणूनच ओळख होती. मात्र, कौटुंबिक वाद आणि पैशाच्या वादातून हा खून झाला असल्याची माहिती आहे.
आंदेकर टोळीचा इतिहास काय?
काही वर्षांपूर्वी आंदेकर आणि माळवदकर यांच्यात गँगवॉर भडकले होते. यामध्ये टोळी युद्धातूनच प्रमोद माळवदकर या गुंडाचा खून करण्यात आला होता. याच खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा पूर्ण करून परत आल्यावर सूर्यकांतने गुन्हेगारी सोडली नाही. सूर्यकांत आंदेकर याच्या विरुद्ध फरासखाना, खडक व समर्थ या पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्यात देखील काही गुन्हे दाखल आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील शेळकेंनी नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी; गडकरी म्हणाले, ‘तुमचं काम झालंच म्हणून समजा’
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
-पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम