पुणे : येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. साधारणपणे दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आपापल्या मतदारसंघातील विकासकामे आटोपण्याकडे सर्व लोकप्रिनिधींचे लक्ष आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरुन मावळचे आमदार सुनील शेळके आणि महामार्ग कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
कृती समितीकडून दिलेल्या निवेदनामध्ये प्रस्तावित एनएच ५४८-डी तळेगाव-चाकण-शिक्रापूर सहा पदरी उन्नत महामार्गाच्या भूसंपादनाची सनद प्रसिद्ध करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. या सदर महामार्ग एमएसआईडीसीकडे (महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) वर्ग करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी गडकरींकडे करण्यात आली. त्यावर तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झालेच म्हणून समजा, असा शब्द नितीन गडकरी यांनी सुनील शेळके आणि त्यांच्या शिष्ठमंडळाला दिला आहे.
दरम्यान, प्रस्तावित उन्नत महामार्गाचे काम पूर्ण होण्यास लागणारा मोठा कालावधी पाहता, तोपर्यंत तात्पुरती उपयोजना आणि किमान अस्तित्वातील ५४ किलोमीटर रस्त्याचे अतिक्रमण हटवून तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याचे दुभाजकावर चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी देखील कृती समितीकडून गडकरींकडे करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
-पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम
-‘सकाळी लवकर उठता मग, आमच्यावर उपकार करता का? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजितदादांना सुनावलं