पुणे : हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सांगता येत्या काही दिवसात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेवटच्या सोमवारी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे कोथरूड विधानसभेचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या शिवस्व प्रतिष्ठान तर्फे १००१ दाम्पत्यांचा सामूहिक रुद्र पूजन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात १०० दिव्यांग दांपत्य देखील यात सहभागी होणार आहेत.
रुद्र पूजनानंतर शिव तांडवाचेही आयोजन करण्यात आले आहे. २ सप्टेंबर रोजी शेवटच्या श्रावण सोमवारी सायंकाळी ४ वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर येथे हा अनोखा महोत्सव पार पडणार आहे. पुण्यातील या सर्वात मोठ्या रुद्र पूजन महोत्सवात सपत्नीक सहभागी व्हा, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
या रुद्रपूजनासाठी नाव नोंदणी करावी लागणार असून यासाठी क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल. ज्यांना नाव नोंदवायला मिळाले नाही, अशा जोडप्यांनाही शिवतांडव पाहता येईल. अयोध्याधाम येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा मुख्य पुरोहित वेदशास्त्रसंपन्न सुजित देशमुख (गुरुजी) यांच्या द्वारे हा रुद्र पूजन होणार आहे. तसेच राष्ट्रसंत प. पु. गुरुवर्य ह. भ. प. भाऊ महाराज परांडे आणि ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे शुभ आशीर्वाद लाभणार आहेत. या व्यतिरिक्त या आगळ्यावेगळ्या महोत्सवाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी
-जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य
-तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन अजित पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले, ‘यामुळे….’