पुणे : ऐन विधानसभेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महयुतीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. ‘राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात’, असे तानाजी सांवत म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंतांच्या वक्तव्यामुळे काय परिणाम होतील याची कल्पना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सावंतांना प्रत्युत्तरही दिले आहे. त्यातच आता आमदार सुनील शेळके यांनी देखील सावंतांवर आगपाखड केल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सत्तेत आल्यापासून तानाजी सावंतांच्या पोटात नेमकं काय गेलंय? हे माहीत नाही. त्यांना जे बोलायचं ते बोलून घेऊ द्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत कोण-कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलो आणि कोणाची गरज कोणाला आहे, हे लक्षात येईल, असे म्हणत सुनील शेळके यांनी सावंतांना सणसणीत उत्तर दिले आहे.
ऐन विधानसभेच्या तोंडावर तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुतीतून वेगळी होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सावंतांचे वक्तव्य जिव्हारी लागले असून येत्या विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावंतांनी केलेल्या वक्तव्यावरुन सावंत माघार घेऊन हा वाद इथेच संपवतात की आणखी उफाळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी
-जटोली शिवमंदिरात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा, आकर्षक विद्युत रोषणाई वाढवणार सौंदर्य
-तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन अजित पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले, ‘यामुळे….’
-कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ