पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीची सर्व राज्यभर तयारी सुरु आहे. अशातच आता महायुतीमध्ये जागावाटपावरुन मोठा वाद उभा राहिल्याचे पहायला मिळत आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेच्या मतदारसंघापैकी इंदापूर मतदारसंघामध्ये भाजपचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्यात मोठा वाद उफाळला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेतून आपली मोठी ताकद दाखवत आहेत. त्यातच आमदार भरणे देखील मैदानात उतरले असून इंदापूरमध्ये गुलाबी वातावरण पहायला मिळत आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा आता आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीची यात्रा आली ते जे बोलले हा महायुतीचा धर्म आहे का? जागा वाटप व्हायचं आहे. कुणाला कुठलं जागा मिळायची हे बाकी आहे. अजित पवारांना जाहीर प्रश्न विचारतो. तुम्ही इंदापूरमध्ये येऊन काय सांगितलं. फडणवीस जो निर्णय घेतील तो मी मान्य करणार असं अजित पवार म्हणाले. तरीही, त्यांनी इंदापूरमध्ये येऊन जाहीर काय केलं. इंदापूर च्या जनतेला दुखावण्याचा अधिकार नाही. हर्षवर्धन पाटील सर्व गोष्टी सहन करेल अपमान सहन करणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन पाटीलांनी चांगलंच खडसावलं आहे.
‘माझ्या बाबतीत उमेदवारी तिकीट हा कायमच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. जिथं, जिथं योग्य भूमिका घ्यायची गरज आहे, तिथं घेऊ. मला ही राजकारणात ४० वर्ष झाली आहेत. मलाही राज्यातली आराखडे कळतात. मला अडाणी समजू नका. पुढील काळात विस्कटलेली घडी दुरुस्त करायची आहे. थोडा वेळ लागेल’, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन अजित पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले, ‘यामुळे….’
-कॅन्टोन्मेंटमध्ये बदलाचे वारे! कुरघोडीच्या राजकारणात बागवेंचा पत्ता कट? साळवेंना काँग्रेसचं बळ
-पुजा खेडकर प्रकरणी पुण्यातील वायसीएम रुग्णालयासह अधिष्ठताही अडचणीत; वाचा नेमका काय प्रकार?
-धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…
-पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा