पुणे : पुण्यातील बडतर्फ माजी प्रोबेशनली अधिकारी पूजा खेडकर गेल्या महिन्यापासून चांगलीच चर्चेत आहे. पूजा खेडकर प्रकरणामध्ये दिवसेंदिवसे नवे खुलासे होत आहेत. पूजा खेडरला वायसीएम रुग्णालयाने डाव्या गुडघ्यामध्ये कायमस्वरुपी अपंग असल्याचे सांगत अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे आता वायसीएम रुग्णालयासह डीन डॉ. राजेंद्र वाबळेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
वायसीएमने पूजा खेडकर यांना दिलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित झाली असल्याने दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ज्यांच्या संमती सहीने हे प्रमाणपत्र देण्यात आले त्या डॉ. राजेंद्र वाबळेंची देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. डॉ. वाबळेंचा चौकशी अहवाल राज्य दिव्यांग आयुक्तालयाने फेटाळला आहे. तसेच पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालय आणि डॉक्टर वाबळे यांची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण प्रधािन सचिवांसह राज्य सरकारच्या संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
बनावट ओळखीच्या आधारे नागरी सेवा परीक्षेत बसल्याबद्दल युपीएससीने गेल्या महिन्यात पूजा खेडकरवर फौजदारी गुन्हा दाखल केला असून कडक कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, आयटी कायदा आणि अपंग व्यक्तींचे हक्क कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे. ३१ जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली आणि भविष्यात परीक्षांना बसण्यास मनाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! आईच्या प्रियकरानेच अल्पवयीन मुलीसोबत केलं ‘हे’ कृत्य; आईचं दुर्लक्ष, पण…
-पुणे विमानतळावरील प्रवास होणार अधिक सुखकर; मुरलीधर मोहोळ यांनी केली ‘ही’ घोषणा
-काश्मीर खोऱ्यात यंदाही साजरा होणार गणेशोत्सव, पुणे शहरातील मंडळांचं सहकार्य
-मालवणमधील राजकोट दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मूक आंदोलन