पुणे : पुण्यातील जिल्हा रुग्णालय ससून हे गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे. कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्यामुळे ससून रुग्णालयातील २ डॉक्टर अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यातच बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी सोडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक मुद्द्यावरुन ससून रुग्णालयाची चर्चा होत आहे.
ससून रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआरआय मशीन गेल्या २० दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना माघारी फिरावे लागत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यातच रुग्णालयातील इतर एक्स-रे, सिटी स्कॅनसाठी रुग्णांना ४ दिवस वाट पहावी लागत आहे.
ससून रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरवर एमआरआय सेंटर आहे. तिथे जिल्ह्यातून हजारो नागरिक उपचारासाठी येत असतात. मशीन बंद असल्याने तसेच ४-४ दिवस वाट पहावी लागत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत असून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ससून रुग्णालयाकडे दुर्लक्ष होते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर बिल्डर अविनाश भोसलेंना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; नेमकं काय प्रकरण?
-पुणे जिल्ह्यात २१ दिवसात मतदार संख्येत लाखोंनी झाली वाढ; आकडेवारी आली समोर
-भाजपची गुंडांशी जवळीक; गुंड गजा मारणेंने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, व्हिडीओ व्हायरल
-..तर लाडकी बहीण योजनाच बंद करू, न्यायालयाने सरकारला फटकारले; नेमकं काय घडलं?
-पुणे हिट अँड रन प्रकरण: आरोपी मुलावर कारवाई करण्याबाबत पोलिसांनी केली ‘ही’ मोठी मागणी