पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीची सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. तसेच निवडणुकीसाठीची पुणे जिल्ह्याची अंतिम मतदार यादी तयार झाली आहे. पुणे जिल्ह्यात एकूण २१ मतदारसंघ असून ६ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीपेक्षा आता जाहीर होणाऱ्या यादीत तब्बल २ लाख ७ हजार मतदार वाढले आहेत. ही मतदार यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.
अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार असून, या वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांमध्येही सुमारे १०० ने वाढ होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यात ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार होते. त्यावर २० ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावर कार्यवाही होऊन मंगळवारी यादीला अंतिम स्वरूप देण्यात आले.
प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत यात २ लाख ७ हजार ४४३ मतदारांची भर पडली आहे. या मतदार यादीत ४४ लाख ९१ हजार ६८ पुरुष, ४१ लाख ५५ हजार ३३० महिला आणि ७७४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या या अंतिम मतदार यादीनुसार सर्वाधिक ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहे. त्या खालोखाल ६ लाख ८ हजार १७४ मतदार
हडपसरमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपची गुंडांशी जवळीक; गुंड गजा मारणेंने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, व्हिडीओ व्हायरल
-..तर लाडकी बहीण योजनाच बंद करू, न्यायालयाने सरकारला फटकारले; नेमकं काय घडलं?
-पुणे हिट अँड रन प्रकरण: आरोपी मुलावर कारवाई करण्याबाबत पोलिसांनी केली ‘ही’ मोठी मागणी
-‘सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये’; सुप्रिया सुळेंचे बारामतीत आंदोलन
-पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अन् प्रियकराने दिली धमकी, पतीने घेतला गळफास