पुणे : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्यांचा शिल्पकार आणि बांधकामाचा सल्लागार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीमध्ये रस्त्यावर उतरुन आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बारामतीत आज तीन हत्ती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कॉंग्रेस, ‘आप’सह महाविकास आघाडीतील घटक पक्ष सहभागी झाले होते.
सरकारने आमच्या दैवताचा अपमान करुन नये. राज्यात महिलांबाबत जे काही सुरु आहे त्यासाठी आम्हाला देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा पाहिजे. छत्रपती महाराजांचा पुतळ्याबाबत ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट केलं त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशा ३ मागण्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये. pic.twitter.com/7DP8wIsG4c
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 28, 2024
“मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाबाबत झालेली घटना ही वेदनादायी आणि दुःखदायक आहे. राज्यात कॉन्ट्रॅक्टर लॉबीच ‘लाडकी’ झाली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी,” अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पत्नी अन् प्रियकराने दिली धमकी, पतीने घेतला गळफास
-विधानसभेसाठी पुण्यात शरद पवारांची खेळी! मागवले आठही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज
-बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
-बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामला पुण्यात का आणलं?