पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. रोज नव्याने घटना घडत असल्याचे समोर येते. शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या वादातून पतीने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोपान धोंडीबा केंद्रे (वय ३३, रा. विठ्ठलवाडी, लोणीकंद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी केंद्रे यांची पत्नी आणि तिचा प्रियकर मधुकर अंबाजी केंद्रे (रा. नांदेड) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोपान यांच्या आईने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पत्नी विवाहबाह्य संबंध सोडायला तयार नाही, प्रियकराने जीवे मारण्याची दिलेली धमकी दिली होती. त्यानंतर या सर्व त्रासाला कंटाळून सोपान केंद्रे यांनी ६ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेसाठी पुण्यात शरद पवारांची खेळी! मागवले आठही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज
-बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
-बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामला पुण्यात का आणलं?
-संयुक्त दहीहंडीला पुणेकरांची पसंती, पूनीत बालन ग्रुपच्या दहीहंडीचा थरार