पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरातील सर्व इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत.
शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीच्या तयारीत आघाडी घेतली आहे. पक्षाचे मजबूत संघटन आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असलेली इच्छुकांची संख्या पाहता शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या सूचनेवरुन सर्व इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडूनही अर्ज मागवण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘येत्या २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत अर्ज स्विकारण्याची मुदत असून, सर्व इच्छुकांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत जमा करावा’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामती विधानसभेची उमेदवारी युगेंद्र पवार यांना देणार का? सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
-पुणे पोलीस दलात मोठी खळबळ; IPS भाग्यश्री नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
-बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसारामला पुण्यात का आणलं?
-संयुक्त दहीहंडीला पुणेकरांची पसंती, पूनीत बालन ग्रुपच्या दहीहंडीचा थरार