पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एका तडीपार गुंडाने भाजपचा झेंडा हातात घेऊन थेट पोलीस ठाण्यासमोरच ‘मै हूँ डॉन’ आणि ‘बाप तो बाप रहेगा’ ही गाणी लावून डान्स केला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाम्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश ऊर्फ दोडया अनंत काथवटे आणि ऋषीकेश ऊर्फ ऋषी राजू शिंदे (रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर) अशी या गुन्हा दाखल झालेल्या तडीपार गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात भाजपच्या उमेदवाराचा विजय आणि केंद्रात एनडीएचे बहुमत या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आला. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या जवळ देखील स्पीकर लावून विजयोत्सव साजरा केला जात होता.
सहकारनगर पोलीस ठाण्याजवळ दोडया आणि ऋषी हे दोघे उपस्थित होते. त्यांनी याठिकाणी स्पीकरवर लावण्यात आलेल्या गाण्यांवर नाच सुरू केला. हे आरोपी नुकतेच मोक्कामधून येरवडा कारागृहामधून बाहेर आलेले आहेत. त्यांना तडीपारीचे आदेश देण्यात आलेले होते. तरीदेखील हे दोघे थेट पोलीस ठाण्यासमोरच नाचताना दिसून आले. या नंतर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“दादांना सांगा ताई आली” असं म्हणत शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
-बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांची ‘या’ पदावरुन हटवलं
-अजित पवार गटाच्या महत्वाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी! शरद पवार गटात परतणार?
-…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार
-अजित पवारांना एकच जागा; शरद पवार म्हणाले, ‘त्यांच्या राष्ट्रवादीचे भविष्य…’