मुंबई : अनेक कलाकारांचे काहीना काही शब्द फेमस असतात. तसेच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा देखील भिडू हा शब्द चर्चेत आहे. जॅकी श्रॉफ नॉर्मल बोलतानाही अनेकदा ‘भिडू’ शब्दाचा उच्चार करत असतात हे सर्वानाच माहिती आहे. आपल्या उत्तम अभिनयाबरोबरच पर्यावरण प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
प्रत्येकाची आपापली एक वेगळी स्टाईल असते. काही खास शब्द, बोलण्याची पद्धत, चालण्याची स्टाईल असते. पण ‘लोक विनापरवानगी जॅकी श्रॉफ यांचे नाव कामासाठी वापरतात’, त्यामुळे नाराज असलेल्या जॅकी यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहता वर्ग आहे. जॅकी श्रॉफ यांची ‘भिडू’ म्हणण्याची स्टाइल तर खूपच लोकप्रिय आहे.
परवानगीशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा वापर होत असल्याबद्दल जॅकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. जॅकी श्रॉफ यांन उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेनुसार, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांचे नाव व भिडू शब्दाच्या वापराबाबत अधिकार हवे आहेत. त्यांनी १४ मे रोजी ही याचिका दाखल केली आहे. विना परवानगी त्यांचे नाव, फोटो, आवाज आणि भिडू, जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गू दादा अशी वेगवेगळी नावं कोणत्याही व्यासपीठावर वापरण्यास बंदी घालण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. शब्द वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि दोन कोटी १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?
-मतदानापूर्वी पोलीस ठाण्यात राडा; रवींद्र धंगेकरांसह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो