पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराची ओळख आता बदलत चालली आहे. दिवेसेंदिवस शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेमुळे धायरी भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सख्या बहिणीचा खून करुन १८ वर्षीय भावाने तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासातून वेगळंच सत्य समोर आलं आहे. आजारी असणाऱ्या बहिणीला भावानेच खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरातील हडपसर भागामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी मृत तरुणीची आकस्मित म्हणून नोंद करण्यात आली. मात्र, आता मृत तरुणीच्या भावाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साफिया सुलेमान अन्सारी (वय १६) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. आरोपी शारिख सुलेमान अन्सारी (वय १८) विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
-प्रदेशाध्यक्ष पुण्यात अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, अंतर्गत वाद चव्हाटयावर
-देशात पेपरफुटीविरोधी कायदा लागू; कारवाईची तरतूद काय असणार? वाचा सविस्तर…
-‘अजितदादांना एकटं पाडलं जातंय त्यांनी महायुती सोडावी अन्…’; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचं वक्तव्य