पुणे : पुणे शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. या दरम्यान गणेश सोहळ्यासह विसर्जन मिरवणुकीला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. शहरातील विसर्जन मिरवणुकी निमीत्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. शहरातील मध्य भागातील १७ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले करून देण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरूवात होणार आहे.
कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार?
मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता, गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावर तसेच खंडुजीबाबा चौक ते वैशाली हॉटेल चौक या रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, छत्रपती शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलियार रस्त्यावरील दारूवाला पूल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दुर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले स्मारक चौकातून वाहतूक वळवण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी
-पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
-अजित पवारांकडून निवडणूक आयोगाचा नियम भंग; इव्हिएम रथाला हिरवा झेंडा दाखवला?
-‘राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर…’; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?
-पुण्यात विधानसभेचे मतदारसंघ ८ अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५; कसं असणार जागावाटप?