पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) या शिक्षण मंडळांच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.
त्यानंतर आता राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी (२१ मे) जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाकडून निकालाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढणार आहे.
बारावीचा निकाल कुठे पाहता येणार?
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फक्त उद्या दुपारपर्यंत वाट पहावी लागणार आहे. दुपारी ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. या निकालामध्ये आता काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. ऑनलाईन निकालानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीत केल्या जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…
-आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे
-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल
-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर