पुणे : सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यी आता निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही निकाल कधी लागणार याकडे लक्ष लागून आहे. आता दहावीचा निकाल या मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आले आहे. मात्र अजूनही दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. मे महिन्याच्या चाैथ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागेल. एकंदरीतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात लागेल. माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठी माहिती दिली आहे. आता निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहे.
राज्यात दहावीची परीक्षा ही १ मार्च ते २६ मार्च २०२४ पर्यंत सुरू होती. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ यादरम्यान पार पडली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकालाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. अगोदर बारावीचा निकाल लागेल आणि त्यानंतर दहावीचा निकाल लागेल.
या वेबसाईटवर निकाल पाहता येणार
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेब साईटवर दहावीचा निकाल पाहू शकता. यासाठी विद्यार्थ्यांचा परीक्षा क्रमांक आवश्यक आहे.
- mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी
-संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
-अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली
-Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
-पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान