पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च २०२५ यावर्षाच्या दाहवी-बारावीच्या परीक्षेची प्रवेश पत्राबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षा पत्रावर (हॉल तिकीट) जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण तज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यंदाचे वर्षी दहावी, बारावी बोर्डाच्या हॉल तिकीटमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि त्यामध्येच विद्यार्थी कोणत्या जातीच्या प्रवर्गात मोडतो हे स्पष्ट हॉल तिकीटवर असलेल्या रकान्यात दिसत आहे. बोर्डाने याचे स्पष्टीकरण देताना ‘शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी का झाली आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी हॉल तिकीटवर जात प्रवर्गाचा रकाना देण्यात आला आहे’, असं सांगितलं आहे.
कागदपत्रावर जातीची नोंद चुकली असेल तर पालकांना शिक्षणाधिकारी उपसंचालक कार्यालयातून योग्य ती कागदपत्रे सादर करून तो बदल करून घेता येईल, विद्यार्थ्यांची जातीची नोंद शाळेमध्ये योग्य झाली आहे हे कळण्यासाठी हॉल तिकीट वर जात प्रवर्ग दिला असल्याचा सांगितलं गेलंय. सामाजिक न्याय विभागाला विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देता यावा, यासाठी दरवेळी जात निहाय आकडेवारी विद्यार्थ्यांची द्यावी लागते. त्यासाठी हॉल तिकिटावर योग्य ती जात प्रवर्ग कळल्यास त्याचा उपयोग होईल, असं बोर्डाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट वितरित करायला सुरुवात झाली असून दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट सोमवारपासून वितरित केले जाणार आहेत. एकीकडे शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हटवण्याची मागणी होत असताना बोर्डाकडून जात प्रवर्ग हॉल तिकीट वर दिला जात असल्याचं समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दिल्लीतून आणलेल्या बनावट नोटांची पुण्यात वटवणी; पोलिसांनी केला पर्दाफाश
-राज्यात सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाचा निर्णय; शालेय शिक्षणंत्र्यांनी केली घोषणा
-अजितदादांच्या बालेकिल्ल्यात नवा ट्विस्ट; बड्या नेत्यांची होणार घरवापसी
-किरीट सोमय्यांचा मोठा दावा; ‘…तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळेंसोबत होता’