पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णी सुरु आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे दोन्ही पक्षांतील दोन्ही गट एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच शनिवारी पुण्यात झालेल्या डीपीडीसी बैठकीमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात थेट शाब्दिक चकमक पहायला मिळाली.
पिंपरीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना घड्याळ भेट म्हणून दिले. यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली असून अजित पवार आणि घड्याळ या पक्षचिन्हावर टीका करण्यात आली आहे.
स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो.
त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्हं सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक आहे दाखवतय. pic.twitter.com/nvPbeafcbL
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 21, 2024
‘स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्हं सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटं शिल्लक आहे दाखवतंय’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती
-आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’
-आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?