पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत नाही. याबाबत रोज काही ना काही गुन्हेगारीच्या घटना कानावर पडतात. या गुन्हेगारीने पुणेकर देखील हैराण झाले आहेत. त्यातच आता शहरातील गंज पेठमध्ये असाच प्रकार पहायला मिळाला आहे. महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील १० कोटी ठेका मिळवण्याच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी महापालिकेच्य मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या भावाविरोधात खडक पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्याात आला आहे. कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय ३७) आणि महेश राजेंद्र गिते (वय ३५, दोघे रा. भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते निर्मल मोतीलाल हरिहर (वय ३६, रा. मंगल क्लब मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) यांनी याबाबत खडक पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.
नेमकं काय झालं?
हरिहर हे महापालिकेत ठेकेदार आहेत. ते रविवारी (२१ जुलै) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीस निघाले होते. गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाजवळ ते थांबले होते. त्या वेळी हरिहर यांच्या ओळखीतील महापालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश तेथे आले. गिते यांनी हरिहर यांच्या पोटाला रिव्हॉल्वर दाखवले. हरिहर यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणून हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिली,’ असे हरिहर यांनी फिर्यादीत सांगितले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती
-आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’