भिमाकोरेगाव अभिवादनासाठी येणार्या अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभुमी येथे देण्यात येणार्या सुविधा द्याव्यात असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले. तसेच भिमा कोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पवार यांनी शिष्ठमंडळास आस्वासन दिले .
भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे व बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ , पांडूरंग शेलार यांचे शिष्टमंडळाने नागपूर येथील अजित पवार यांचे शासकीय निवासस्थानी भेट घेउन निवेदन दिले. यावेळी पवार यांनी आता पर्यंत केलेल्या तयारीची माहीती शिष्टमंडळाकडून घेतली. व यावर्षी देखिल आपण अभिवादनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भिमाकोरेगाव येथे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडणार नाही असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. तसेच यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी भिमाकोरेगाव राष्ट्रीय स्मारका संदर्भात शासनाकडे पाठवलेल्या 90 कोटी रुपयांच्या आराखड्याची सद्यस्थिती तपासुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांना दिले आहेत. तसेच स्मारकासाठी लवकरच आढावा बैठक धुन कृती कार्यक्रम ठरविले जाईल. असेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान अजित पवार यांनी भिमाकोरेगाव स्मारक व अभिवादन सोहळा नियोजनात लक्ष घातल्याने यंदाच्या वर्षी अधिक दर्जेदार सुविधा मिळतील असा विश्वास भिमाकोरेगाव विजयस्तंभ समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी व्यक्त केला.