पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारवेळी सत्ताधारी विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळते. विरोधकांवर टीका करताना काही नेत्यांना भान राहत नाही. पातळी सोडून टीका केल्याची अनेक उदाहरणे वारंवार पहायला मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि लोकसभा निरीक्षकांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
“विरोधक खालच्या पातळींवर टीका करत आहेत. पण आपण पातळी सोडायची नाही. शिव्याशाप द्यायचे नाही. विरोधकांना एक्स्पोज करा. हिंदूत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. शिवाजी पार्कला हिंदू बांधव भगिनी म्हणायची त्यांना लाज वाटली. २०१९ साली त्यांनी जन्मकाळा अनादर केला आहे. बाळासाहेबांच्या इच्छेविरूध्द वागत आहेत. ‘बिलो द बेल्ट’ टीका करू नका, त्यांचा खरा चेहरा समोर आणा, सरकारने केलेली कामे मुद्देसूद मांडा”, असा सूचना एकनाथ शिंदेंनी पक्ष प्रवक्त्यांना दिल्या आहेत.
“एका ठिकाणच्या आरोप प्रत्यारोपांचे पडसाद सर्वत्र उमटतात. पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरोधात कुणालाही जाता येणार नाही. आपण मराठा आरक्षण दिलंय. कोर्टात टिकणारं आरक्षण आहे. पोलीस भरती या आरक्षणानुसार होत आहेत. मराठा समाजाला न्याय दिला ओबीसींवर अन्याय केला नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
लोकसभा निरीक्षकांना मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या?
- निवडणुकीकरिता मध्यवर्ती कार्यालय 24 तास कार्यरत असणार आहे.
- प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यालय कार्यान्वित करून कामाला सुरुवात करावी.
- विधानसभा निहाय बैठका घेऊन संघटना ॲक्शन मोडमध्ये आणावी.
- शाखा-शाखांशी संपर्क ठेवावा, महायुतीच्या स्थानिक नेतृत्वाची संपर्क व समन्वयक ठेवावा. त्यांच्या बैठका घ्याव्यात.
- संयुक्त मिळावे घ्यावेत, संयुक्त प्रचार करावा, चौक सभा, संयुक्तपणे घरोघरी प्रचार करावे.
- प्रत्येक वोटिंग स्लिप वाटण्यात याव्या. मोठ्या सभा रॅली यासाठी समन्वयाने काम करावे.
- प्रचार साहित्यावरती प्रोटोकॉलनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे फोटो याचा वापर करावा.
- प्रचार आणि सभांच्या संपूर्ण नियोजनावरती पारित लक्ष ठेवावे.
- महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स पोस्टर होल्डिंग यासाठी परवानगी घेऊनच लावावे.
- स्थानिक पातळीवरती मत वाढवण्यासाठी विविध जाती धर्म सामाजिक संघटना यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवावा.
- समोरच्या गटातील नाराज पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा पक्ष प्रवेश अथवा वोटिंगसाठी त्याची मदत घ्यावी.
- स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत वाद कृपया ताबडतोब मिटवावे.
- आचारसंहितेचा भंग होता कामा नये आणि जर कोणी भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट मध्यवर्ती कार्यालयात द्यावा.
महत्वाच्या बातम्या-
-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला
-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास
-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’
-महायुतीत वादाची ठिणगी “शिवतारेंना आवरा, त्यांच्यामुळे महायुतीतील वातावरण खराब होतंय”
-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”